Manish Jadhav
मधुमेह हा असा आजार आहे ज्यासाठी आहाराची अत्यंत काळजी घ्यावी लागते. मात्र, मधुमेही रुग्णांनी दूधाचे सेवन करावे की नको याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो.
दूधात लॅक्टोज नावाचा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट असतो, जो रक्तातील साखर वाढवू शकतो. म्हणून, मधुमेही रुग्णांनी जास्त प्रमाणात दूध पिऊ नये.
मधुमेही रुग्णांनी जास्त प्रमाणात दूध प्यायल्यास शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो.
मात्र मधुमेही रुग्णांसाठी गाईचे दूध फायदेशीर ठरु शकते.
मधुमेहाचे रुग्ण दूधात हळद मिसळून पिऊ शकतात. हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरु शकतात.
मधुमेहाचे रुग्ण दूधात दालचिनी टाकून पिऊ शकतात. दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात, जे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरु शकतात.