मधुमेह त्वचेवर करू शकतो गंभीर परिणाम; जाणून घ्या!

Akshata Chhatre

त्वचेची काळजी

इतर अवयवांप्रमाणेच त्वचा हा माणसाचा एक महत्त्वाचा अवयवच आहे. मधुमेही रुग्णांनी त्वचेची काळजी अधिक घ्यायला हवी. कारण या रुग्णांच्या त्वचेवर इन्फेक्‍शन होण्याचे प्रमाण अधिक असते.

diabetes and skin problems| skin issues in diabetes | Dainik Gomantak

बॅक्‍टेरिअल इन्फेक्‍शन

सामान्यपणे मधुमेही रुग्णांना बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शनचा प्रादुर्भाव जास्त होतो, असे लक्षात आले आहे. पापण्या, डोळ्यांच्या ग्रंथी, केसांची मुळे यांसारख्या जागी त्यांचा प्रादुर्भाव असतो.

diabetes and skin problems| skin issues in diabetes | Dainik Gomantak

फंगल इन्फेक्‍शन

ज्या ठिकाणी घाम साठून राहतो त्या जागी फंगल इन्फेक्‍शन प्राधान्याने होते. उदाहरणार्थ, पायांच्या, बोटांच्या भेगा, बोटांची नखे, जांघा, सांध्याच्या पोकळ्या, अगदी तोंडाच्या पोकळीत सुद्धा फंगल इन्फेक्‍शन होऊ शकते.

diabetes and skin problems| skin issues in diabetes | Dainik Gomantak

खाज सुटणे

मधुमेही रुग्णांत रक्‍ताभिसरण व्यवस्थित न झाल्यामुळे त्वचा कोरडी पडते, त्यामुळे अंगाला खाज सुटते. काही व्हायरल व बॅक्‍टेरियल इन्फेक्‍शन देखील त्वचेवर परिणाम करते.

diabetes and skin problems| skin issues in diabetes | Dainik Gomantak

डायबेटिक डर्माटोपॅथी

रक्तवाहिन्या क्रियाहीन झाल्यामुळे त्वचेवर जांभळट गडद असे चट्टे व पॅचेस तयार होतात. उपाय म्हणून झिंक व नॉयलचा डोस कित्येक महिने दिल्यास रोग आटोक्‍यात येऊ शकतो.

diabetes and skin problems| skin issues in diabetes | Dainik Gomantak

नेक्रोबॉयासिस

डॉयबेटिक डर्माटोपॅथीचाच हा विकसित प्रकार आहे. त्वचेमध्ये खोलवर त्याचा प्रादुर्भाव झालेला असतो. त्याचे रूपांतर जखमांमध्ये होऊ शकते.

diabetes and skin problems| skin issues in diabetes | Dainik Gomantak
आणखीन बघा