Sameer Panditrao
छत्तीसगडमधील दुर्गम क्षेत्रातील जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आलेले धुडमारस हे गाव आता सौरऊर्जेच्या वापरासाठी ओळखले जात आहे.
या गावाची वाटचाल संपूर्ण सौरऊर्जेच्या दिशेने सुरू झाली आहे.
‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन’ने (यूएडब्लूटीओ) गेल्या वर्षी पर्यटनाच्या दृष्टीने विकासासाठी जगभरातील २० निवडक गावांमध्ये धुडमारस गावाला समाविष्ट केले होते.
घनदाट हिरवळ, विविध प्राणी-पक्षी, कांगेर नदीचे नैसर्गिक सौंदर्य आणि बस्तरिया आदिवासी संस्कृती यामुळे धुडमारस आता पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या नेतृत्वाखाली बस्तर प्रदेशात सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी जागतिक पर्यटन दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने बस्तर जिल्ह्यातील धुडमारस आणि चित्रकोट ही गावे बस्तरमधील सर्वोत्तम पर्यटन गावे म्हणून गौरविली होती.
छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या बस्तर जिल्ह्यातील ‘कांगेर व्हॅले नॅशनल पार्क’मध्ये धुडमारस हे गाव वसलेले आहे.