Manish Jadhav
भारत 'अ' आणि ऑस्ट्रेलिया 'अ' यांच्यातील सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने शानदार शतक झळकावले. तो सध्या लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी ध्रुव जुरेलने हे शतक झळकावून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे.
लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळताना जुरेलने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने मैदानातील जवळपास सर्व बाजूंना फटके मारत चौकार आणि षटकारांची बरसात केली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ध्रुव जुरेल 132 चेंडूंमध्ये 113 धावांवर नाबाद आहे. त्याने आपल्या या खेळीत 10 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार लगावले. खेळीदरम्यान स्ट्राईक रेट 85.60 इतका होता.
जुरेलच्या हे कारकिर्दीतील दुसरे प्रथम श्रेणी शतक आहे. त्याने यापूर्वीही अशा महत्त्वपूर्ण खेळी खेळून आपल्या क्षमतेचे दर्शन घडवले आहे.
जुरेलने अनुभवी फलंदाज देवदत्त पडिक्कलसोबत 181 धावांची अभेद्य भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारत 'अ' संघाची स्थिती मजबूत झाली.
त्याने केवळ भारतातच नव्हे, तर इंग्लंडमध्येही आपल्या यष्टीरक्षण आणि फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.
वेस्ट इंडिज मालिकेसाठी निवड होण्याव्यतिरिक्त, जुरेलची ही कामगिरी भारतीय क्रिकेटमधील भविष्यातील एक मोठा स्टार म्हणून त्याची ओळख निर्माण करत आहे.