Manish Jadhav
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये उत्तर प्रदेशकडून खेळताना ध्रुव जुरेलने बडोद्याविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली. त्याने आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले.
राजकोट येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात जुरेलने केवळ 101 चेंडूंमध्ये 160 धावांची नाबाद आणि स्फोटक खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळे युपीने धावसंख्येचा डोंगर उभा केला.
आपल्या 160 धावांच्या खेळीत जुरेलने 15 चौकार आणि 8 गगनभेदी षटकार ठोकले.
या सामन्यात जुरेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. सुरुवातीपासूनच तो चांगल्या लयीत दिसला आणि त्याने शेवटपर्यंत नाबाद राहून संघाची धुरा सांभाळली.
या शतकापूर्वी जुरेलने हैदराबादविरुद्ध 80 आणि चंदीगडविरुद्ध 67 धावांची खेळी केली होती. या स्पर्धेत तो सातत्याने धावा करत आहे.
विजय हजारे ट्रॉफीमधील या कामगिरीमुळे जुरेलने आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रबळ दावा ठोकला आहे.
जुरेलशिवाय अभिषेक गोस्वामीने 51 आणि प्रशांत वीरने 35 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंहनेही आपल्या स्टाईलमध्ये फलंदाजी करत युपीला विशाल धावसंख्या उभारुन दिली.
जुरेलची ही खेळी अशा वेळी आली आहे जेव्हा अलीकडेच झालेल्या आयपीएल लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्सने (CSK) 14.02 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेत खरेदी केले आहे.