IND vs ENG: धोनीच्या रांचीत विकेटकिपर ध्रुव जुरेलचा जलवा

Pranali Kodre

भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीतील जेएससीए क्रिकेट स्टेडियमवर 23 फेब्रुवारी 2024 पासून खेळवला गेला.

India vs England | PTI

ध्रुव जुरेलचे झुंजार अर्धशतक

या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने झुंजार अर्धशतकी खेळी करत अनेकांना प्रभावित केले आहे.

Dhruv Jurel | X/BCCI

धोनीचे घरचे मैदान

विशेष म्हणजे रांची हे भारताचा माजी यष्टीरक्षक आणि कर्णधार एमएस धोनीचे घरचे मैदान आहे. धोनी भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक फलंदाजही आहे.

MS Dhoni | Twitter

धोनीची आठवण

त्याचमुळे रांचीत जुरेलने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केलेल्या कामगिरीमुळे अनेकांना धोनीची आठवण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजेच जुरेलनेही धोनीप्रमाणे खालच्या फळीला हाताशी घेत भारताचा डाव सांभाळला होता.

Dhruv Jurel | X/BCCI

जुरेल कठीण परिस्थितीत आला खेळायला

जुरेलने या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 161 धावांवर 5 विकेट्स गमावल्यानंतर फलंदाजीला आला होता. तो फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघ जवळपास 200 धावांनी पिछाडीवर होता. तो आल्यानंतर सर्फराज खान आणि आर अश्विन यांच्याही विकेट्स झटपट गेल्या होत्या.

Dhruv Jurel | X/BCCI

तळातल्या फलंदाजांबरोबर भागीदाऱ्या

परंतु, नंतर जुरेलने कुलदीप यादवबरोबर 8 व्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली, तसेच 9 व्या विकेटसाठी आकाश दीपबरोबर 40 धावांची भागीदारी केली. त्यामुळे त्याने भारताला 300 धावांचा टप्पाही पार करून दिला.

Dhruv Jurel - Akash Deep | X/BCCI

हर्टलीने घेतली विकेट

अखेर टॉम हर्टलीने जुरेलला बाद करत भारताचा पहिला डाव 307 धावांवर संपवला होता.

Dhruv Jurel | X/BCCI

पहिले अर्धशतक

जुरेलने 149 चेंडूत 90 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक ठरले. दरम्यान, जुरेलने या सामन्यात यष्टीरक्षण करताना 3 झेलही घेतले.

Dhruv Jurel | X/BCCI

WPL 2024: सहा बॉलिवूड सुपरस्टार्सच्या परफॉर्मन्सने रंगला उद्घाटन सोहळा

WPL Opening Ceremony | PTI and AFP
आणखी बघण्यासाठी