WPL 2024: सहा बॉलिवूड सुपरस्टार्सच्या परफॉर्मन्सने रंगला उद्घाटन सोहळा

Pranali Kodre

वूमन्स प्रीमियर लीग 2024

वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला (WPL 2024) 23 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. डब्ल्यूपीएलचा यंदा दुसरा हंगाम आहे.

Shah Rukh Khan - Harmanpreet Kaur | AFP

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

दुसऱ्या हंगामाला 23 फेब्रुवारी रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याने दणक्यात सुरुवात झाली.

WPL Trophy | X/wplt20

उद्घाटन सोहळा

दरम्यान, या सामन्यापूर्वी बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर डब्लुपीएल 2024 हंगामाचा उद्घाटन सोहळा पार पडला.

Sidharth Malhotra | PTI

बॉलिवूड स्टार्सची हजेरी

या उद्घाटन सोहळ्यात अनेक बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली होती. त्यांचे परफॉर्मन्सही चाहत्यांना पाहायला मिळाले.

Shahid Kapoor | PTI

मुख्य आकर्षण

उद्धाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण सुपरस्टार शाहरुख खान राहिला.

Shahrukh Khan | PTI

बॉलिवूडमधील सिनेस्टार

दरम्यान, केवळ शाहरुखच नाही, तर शाहीद कपूर, टायगर श्रॉफ, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कार्तिक आर्यन हे बॉलिवूड अभिनेतेही या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते.

Sidharth Malhotra | AFP

बॉलिवूडचा तडका

या सहाही जणांनी आपल्या परफॉर्मन्सने उद्घाटन सोहळ्याला चार चांद लावल्याचे पाहायला मिळाले.

Tiger Shroff | PTI

कर्णधारांचीही उपस्थिती

या उद्घाटन सोहळ्यात डब्लुपीएलमधील पाचही संघांच्या कर्णधार उपस्थित होत्या.

WPL Opening Ceremony | X/wplt20

R Ashwin 'असा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई अष्टपैलू

R Ashwin | AFP