Dhruv Jurel: पंत आणि धोनीला जे जमले नाही, ते ध्रुव जुरेलने केले, रचला नवा इतिहास!

Manish Jadhav

शानदार विजय

टीम इंडियाने वेस्ट इंडीजविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला.

Dhruv Jurel | Dainik Gomantak

खास योगदान

या मालिकेत यशस्वी जैस्वालने शतकी खेळीने लक्ष वेधले, पण यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने खास विक्रमाची नोंद केली.

Dhruv Jurel | Dainik Gomantak

जुरेलने रचला इतिहास

वेस्ट इंडीजवरील विजयानंतर ध्रुव जुरेल कारकिर्दीच्या सुरुवातीपासून सलग सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय खेळाडू ठरला.

Dhruv Jurel | Dainik Gomantak

विक्रम मोडला

जुरेलने भारतासाठी सलग 7 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला. यापूर्वी, हा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर होता, ज्याने सलग 6 कसोटी सामने जिंकले होते.

Dhruv Jurel | Dainik Gomantak

धोनी आणि पंतलाही जमले नाही

जुरेलने केलेली ही कामगिरी महेंद्र सिंह धोनी आणि ऋषभ पंत यांनाही त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सलग 7 सामन्यांत करता आली नव्हती.

Dhruv Jurel | Dainik Gomantak

पंतच्या जागी मिळाली संधी

ऋषभ पंत जखमी झाल्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत ध्रुव जुरेलला यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली होती आणि त्याने ती सिद्ध केली.

Dhruv Jurel | Dainik Gomantak

कामगिरी

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जुरेलने पहिल्या डावात 44 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर दुसऱ्या डावात नाबाद 6 धावा करुन संघाला विजय मिळवून दिला.

Dhruv Jurel | Dainik Gomantak

कसोटी कारकिर्दी

त्याने आतापर्यंत खेळलेल्या 7 कसोटी सामन्यांमध्ये 47.77 च्या सरासरीने 430 धावा केल्या असून यात 1 शतक आणि 1 अर्धशतक समाविष्ट आहे.

Dhruv Jurel | Dainik Gomantak

मर्सिडीजची सर्वात शक्तिशाली डिझेल G-Wagon लाँच; जाणून घ्या अफलातून फीचर्स

आणखी बघा