Sameer Panditrao
श्री संकर्षण देवालयातील दसरोत्सवात दोन तरंगांचा समावेश असतो. अवतार कौल, पूजा-अर्चा होऊन दसरोत्सवाची सांगता होते.
श्री शांतादुर्गा देवस्थानतर्फे श्री महालक्ष्मी रवळनाथ मंदिरात परंपरेप्रमाणे विधीवत दसरा व नंतर पूजा-अर्चा झाली.
श्री नवदुर्गा देवालयात दसरोत्सवात तीन तरंगे व एक पिल्लकुजाचा लवाजमा असतो. ही तरंगे घेण्याचा मान गडो कुटुंबीयांना आहे तर पिल्लकुजा वेळीप घेत असतात.
निसर्गाशी आपले नाते मजबूत करणारा अंत्रुज महालातील भूतखांब - केरी येथील धनगर समाजाचा दसरोत्सव पारंपरिक पद्धतीने सामुदायिकरित्या उत्साहात पार पडला.
श्री मल्लिकार्जुन देवस्थानात गुरुवार, २ रोजी दसरा उत्सव पारंपरिक रीतीरिवाजानुसार उत्साहात साजरा झाला. यावेळी भूमिपुरुष देवस्थानात आपट्याची पाने लुटणे व इतर धार्मिक विधी झाले.
श्री महादेव भूमिका देवस्थानात शिवलग्न सोहळ्यास मिरवणुकीने निघताना महाजन, जनसमुदाय.
सीमोल्लंघन आदी पारंपरिक विधीसह गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा रवळनाथ देवस्थानचा दसरोत्सव उत्साहात साजरा केला.