Manish Jadhav
बीड जिल्ह्यातील धारुरचा किल्ला हा महाराष्ट्रातील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अभेद्य भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो.
या किल्ल्याची निर्मिती सोळाव्या शतकात झाली. अहमदनगरच्या निजामशाहीत या किल्ल्याला मोठे सामरिक महत्त्व होते. पुढे हा किल्ला मोगल आणि आझमशाहच्या ताब्यातही होता.
हा किल्ला एका बाजूने जमिनीवर आहे (भुईकोट) तर दुसऱ्या बाजूने खोल दरीने वेढलेला आहे. यामुळे हा किल्ला शत्रूसाठी अत्यंत दुर्गम आणि अभेद्य बनला होता.
किल्ल्याच्या तीन बाजूंनी खोल खंदक खोदलेले आहेत. या खंदकांमुळे शत्रूला थेट तटबंदीपर्यंत पोहोचणे अशक्य व्हायचे.
धारुर किल्ल्याची तटबंदी आजही मोठ्या प्रमाणावर शाबूत आहे. किल्ल्यावर अनेक भक्कम बुरुज असून त्यावरुन सभोवतालच्या परिसरावर नजर ठेवली जात असे.
किल्ल्यावर आजही काही जुन्या तोफा पाहायला मिळतात. या तोफा किल्ल्याच्या संरक्षणासाठी विविध बुरुजांवर तैनात केलेल्या असायच्या.
किल्ल्याच्या आत पिण्याच्या पाण्यासाठी एक मोठी विहीर आणि तलावाची सोय आहे. तसेच काही जुन्या इमारतींचे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देतात.
हा किल्ला बालाघाटच्या डोंगररांगेत वसलेला असल्याने, तिथून दिसणारे निसर्गदृश्य पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यात तर या किल्ल्याचे सौंदर्य अधिकच खुलते.