Bhuikot Fort: 500 वर्षांचा इतिहास सांगणारा 'हा' भुईकोट किल्ला; 26 बुरुज अन् ऐतिहासिक तोफांचा आहे खजिना!

Manish Jadhav

परांडा किल्ला

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परांडा हा भुईकोट किल्ला आपल्या भक्कम तटबंदीसाठी आणि लष्करी रचनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

paranda fort | Dainik Gomantak

किल्ल्याचा इतिहास

या किल्ल्याचे बांधकाम 15व्या शतकाच्या उत्तरार्धात बहामणी वंशाचा वजीर 'महमूद गवान' याने केल्याचे मानले जाते. पुढे हा किल्ला निजामशाही आणि आदिलशाहीच्या ताब्यात होता.

paranda fort | Dainik Gomantak

अभेद्य खंदक

किल्ल्याच्या चहुबाजूंनी एक मोठा आणि खोल खंदक आहे. शत्रूने भिंतीपर्यंत पोहोचू नये म्हणून या खंदकात नेहमी पाणी साठवलेले असायचे.

paranda fort | Dainik Gomantak

भक्कम तटबंदी

परांडा किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. बाहेरील आणि आतील अशा दोन मजबूत भिंतींमुळे हा किल्ला शत्रूसाठी अभेद्य बनला होता.

paranda fort | Dainik Gomantak

भक्कम बुरुज

या किल्ल्याला एकूण 26 बुरुज आहेत. प्रत्येक बुरुज आजही भक्कम स्थितीत असून तिथून सभोवतालच्या मैदानी प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जायचे.

paranda fort | Dainik Gomantak

ऐतिहासिक तोफा

परांडा किल्ल्यावर आजही अनेक ऐतिहासिक तोफा पाहायला मिळतात. यात 'मलिक-ए-मैदान' सारखी मोठी तोफ आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण तोफा पर्यटकांचे आकर्षण ठरतात.

paranda fort | Dainik Gomantak

मशिद आणि मंदिर

किल्ल्याच्या आत एक सुंदर मशिद आहे, जिचे खांब जुन्या हेमाडपंती मंदिराच्या शैलीचे वाटतात. हे स्थापत्य कलेच्या विविधतेचे दर्शन घडवते.

paranda fort | Dainik Gomantak

नृसिंह मंदिर आणि विहीर

किल्ल्यामध्ये एक मोठी विहीर आणि भगवान नृसिंहाचे मंदिर आहे. तसेच किल्ल्यातील 'पाचपीर' दर्गादेखील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.

paranda fort | Dainik Gomantak

Valentine Day 2026: व्हॅलेंटाईन डेला तुमचं क्रश 'हो'च म्हणणार; फॉलो करा 'या' 8 टिप्स

आणखी बघा