Sameer Amunekar
धर्मवीर गड हा अहमदनगर जिल्ह्यातील पेडगाव गावाजवळ, भीमा नदीच्या काठावर स्थित ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. याला ‘बहादूरगड’ किंवा ‘पांडे पेडगावचा’ म्हणून देखील ओळखले जाते.
इ.स 13 व्या शतकात यादव कालखंडात पांडे पेडगाव प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण होते.
किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आहेत. गावाकडील प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत असून नदीकडील प्रवेशद्वार जीर्ण झालेले आहे. तटबंदी बऱ्यापैकी टिकलेली आहे आणि खिडक्यांतून भीमा नदीचे दृश्य दिसते.
या किल्ल्यावर आधारित दोन म्हणी प्रसिद्ध आहेत: "आले मोठे पेडगावचे शहाणे" आणि "येड पांघरून पेडनावला जाणे".
बहादुरखान यांनी किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव ‘बहादूरगड’ ठेवले. २००८ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ याला ‘धर्मवीर गड’ असे नाव देण्यात आले.
संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर औरंगजेबाने पेडगाव येथे हलवले आणि येथे संभाजी महाराज व कवी कलश यांना आपल्यासमोर हजर केले.
औरंगजेबने संभाजी महाराजांवर हिंदवी स्वराज्य सोडून मुघल साम्राज्याच्या अधीन येण्याचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी सर्व मागण्या नाकारल्या. त्यावरून औरंगजेबाने संभाजी महाराज व कवी कलश यांचा छळ केला.