Sameer Panditrao
धनुष हा तमिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे.
त्याचं ‘रांझणा’मधील कुंदनचं पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे.
या गाजलेल्या चित्रपटाचा AI वापरून पुन्हा शेवट बदलण्यात आल्याची बातमी समोर येताच, धनुषने तीव्र नाराजी व्यक्त केली.
एआय तंत्रज्ञानाच्या वापराने आता ‘रांझणा’मध्ये कुंदनचा मृत्यू दाखवण्यात आलेला नाही.
मूळ चित्रपटात मात्र कुंदनला गोळी लागते आणि तो झोयाच्या (सोनम कपूर) समोर आयसीयूमध्ये शेवटचा श्वास घेतो.
धनुष म्हणाला, ‘माझ्या स्पष्ट विरोधानंतरही हा बदल करण्यात आला. अशा प्रकारे एआयचा वापर हा कलाकृतीच्या आत्म्यावर गदा आणणारा आहे.’’
त्यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटाच्या मूळ कल्पनेत ढवळाढवळ करणं धोकादायक उदाहरण ठरू शकतं.