गोमन्तक डिजिटल टीम
महादेव मंदिर (तांबडी सुर्ल)
तांबडी सुर्लच्या हिरव्यागार वनश्रीमध्ये वसलेले महादेव मंदिर हे बाराव्या शतकातील कदंब स्थापत्यशैलीचे सुंदर उदाहरण आहे.
श्री अनंत मंदिर, सावय-वेरे (फोंडा)
मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे अनंतशयन शैलीतील विष्णूची शेषनागाच्या फण्याखाली पहुडलेली मूर्ती असलेले एक पावन स्थळ आहे.
श्री परशुराम देवालय, पैंगीण (काणकोण)
हे भगवान परशुरामाचे गोव्यातील एकमेव मंदिर आहे, साध्या ग्रामीण स्थापत्यशैलीतील या मंदिरात पुरातन लाकडी खांबांवर दशावतार आणि राशीचक्र यांचे सुंदर चित्रण आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर, बांदोडा (फोंडा)
धर्मांतराच्या काळात कोलवा गावातून स्थलांतर केलेली श्रीमहालक्ष्मीची मूर्ती आणि मंदिरातील सुंदर सजावट इथे येणाऱ्यांना आकर्षित करते.
श्री दत्त मंदिर, साखळी
हे वाळवंटी नदीकाठी उभे असलेले प्राचीन मंदिर असून, याच्या स्थापत्यशैलीसह शांततेमुळे भक्तांना ध्यानमुद्रेत राहण्यास मदत होते.
श्री सप्तकोटेश्वर मंदिर, नार्वे
हे प्राचीन मंदिर दिवाडी बेटावर बांधले गेले असले तरी पोर्तुगिजांनी ते उध्वस्त केले. पुन्हा उभारलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६८ साली केला.
श्री मल्लिकार्जुन मंदिर, श्रीस्थळ (काणकोण)
हे अडीचशे वर्षांपासून उभे असून, हब्बू ब्राह्मणांनी मंदिराची पुनर्निर्मिती केली आणि सध्या ब्राह्मण व आदिवासी यांच्यात पूजा आळीपाळीने चालू आहे.
श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण मंदिर, फातर्पा (केपे)
फातर्पा हे चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्थापन केलेले असून, दक्षिण गोव्यातील मोरपिर्ल येथून शांतादुर्गा आणि सप्तकोटीश्वराची मूर्तिं आणून येथे मोठे मंदिर उभारले गेले.
श्री महालसा नारायणी मंदिर, म्हार्दोळ (फोंडा)
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दोन दीपस्तंभ आणि कोरीव काम केलेले लाकडी खांब, ज्यामुळे हे मंदिर विशेष आकर्षक ठरते.
श्री दामोदर मंदिर, जांबावली
हे मंदिर सव्वाशे वर्षांपूर्वी उभारले गेले असून, ते प्रशस्त आणि अनेक दैवतांच्या घुमट्यांनी सजलेले आहे.
श्री मोरजाई मंदिर मोरजी,पेडणे
मोरावरून अवतीर्ण झालेल्या देवतेवरून गावाला 'मोरजी' नाव मिळाले आहे. मंदिराची स्थापना स्थानिक ग्रामसंस्थेने केली असून, कालांतराने त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला.
श्री मंगेश देवस्थान, मंगेशी
झुवारी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या कुशस्थळी येथून शिवलिंग मंगेशी येथे आणून स्थापले गेले. सौंदे राजांच्या आश्रयाने मंदिराची उभारणी झाली, आणि ते शिवभक्तांसाठी एक प्रमुख केंद्र ठरले.
श्री चंद्रेश्वर भूतनाथ मंदिर, पर्वत
चंद्रनाथ पर्वताच्या शिखरावर असलेल्या या शिवमंदिराची स्थापना सहाव्या शतकात पृथ्वीमल्ल वर्मन यांनी केली. एकोणिसाव्या शतकात मंदिराचा भव्य जीर्णोद्धार झाला, आणि अलीकडे पुनर्प्रतिष्ठापन झाली.