Manish Jadhav
जी कार रेनोला भारतात यश देऊन गेली, ती 'न्यू जनरेशन रेनो डस्टर' आता 26 जानेवारी 2026 रोजी पुन्हा भारतात लॉन्च होणार आहे.
नवीन डस्टरचा लूक जुन्या मॉडेलपेक्षा अधिक रुबाबदार (Bold) आणि फ्लॅट आहे, ज्यामुळे तिला जबरदस्त एसयूव्ही (SUV) फील मिळतो.
जुन्या गोल हेडलाईट्सऐवजी आता Y-आकाराच्या आकर्षक LED हेडलाईट्स आणि त्याच डिझाईनच्या टेललाईट्स दिल्या आहेत, ज्यामुळे कार अधिक स्टायलिश दिसते.
कारच्या डिझाईनचा खास बदल: मागील दरवाजाचे हँडल (Door Handle) आता C-पिलरमध्ये लपवले आहे.
आतला भाग पूर्णपणे बदलला आहे. आता फ्लोटिंग टचस्क्रीन सिस्टीम आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे.
डॅशबोर्ड नवीन आहे, AC वेंट्सचा डिझाईन बदलला आहे, आणि स्पोर्टी फील देणारे फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील देण्यात आले आहे.
एकूणच, नवी रेनो डस्टर आधीपेक्षा जास्त एडव्हान्स (Advanced), स्टायलिश आणि आधुनिक फीचर्सने परिपूर्ण आहे.