Daulatabad Fort: इतिहासप्रेमींसाठी पर्वणी 'दौलताबाद किल्ला', जिथे प्रत्येक वाटा सांगते एक वेगळी कहाणी

Manish Jadhav

'दौलताबाद' किल्ला

हा किल्ला मूळतः 'देवगिरी' या नावाने ओळखला जात होता. 14 व्या शतकात दिल्लीचा सुलतान मुहम्मद बिन तुघलक याने आपली राजधानी दिल्लीहून येथे हलवल्यावर या किल्ल्याला 'दौलताबाद' असे नाव दिले.

Daulatabad Fort | Dainik Gomantak

अभेद्य आणि अजिंक्य किल्ला

दौलताबाद किल्ला एका त्रिकोणी टेकडीवर वसलेला आहे. हा किल्ला त्याच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित संरचनेमुळे इतका मजबूत आहे की, तो कधीही शत्रूंना जिंकता आला नाही.

Daulatabad Fort | Dainik Gomantak

राजधानीचे केंद्र

दिल्लीचा सुलतान मुहम्मद बिन तुघलक याने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा या किल्ल्याचे महत्त्व प्रचंड वाढले आणि तो एक मोठा ऐतिहासिक टप्पा ठरला.

Daulatabad Fort | Dainik Gomantak

खंदक

किल्ल्याच्या प्रवेशासमोर एक खोल आणि रुंद खंदक आहे, ज्यात पाणी भरलेले असे. हा खंदक पार करणे शत्रूंसाठी जवळजवळ अशक्य होते.

Daulatabad Fort | Dainik Gomantak

धोकादायक 'अंधेरी' बोगदा

किल्ल्यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि धोकादायक ठिकाण म्हणजे 'अंधेरी' नावाचा बोगदा. हा पूर्णपणे अंधारातील बोगदा शत्रूंना आत अडकवून गोंधळात पाडण्यासाठी खास तयार करण्यात आला होता.

Daulatabad Fort | Dainik Gomantak

सुप्रसिद्ध चांद मिनार

किल्ल्याच्या आवारात एक मोठा आणि सुंदर मिनार आहे, ज्याला 'चांद मिनार' असे म्हणतात. 14व्या शतकात याचे बांधकाम करण्यात आले होते आणि हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक स्तंभ मानला जातो.

Daulatabad Fort | Dainik Gomantak

दमदार आणि मोठ्या तोफा

दौलताबाद किल्ल्याच्या तटबंदीवर आजही अनेक मोठ्या तोफा ठेवलेल्या आहेत. यातील 'मेंढा तोफ' (Ram Cannon) सर्वात प्रसिद्ध आहे आणि ती आजही आपल्या भव्यतेची साक्ष देते.

Daulatabad Fort | Dainik Gomantak

अनेक राजवटींचा संगम

या किल्ल्यावर यादव, दिल्लीचे सुलतान, बहमनी आणि मुघल अशा अनेक राजवटींनी राज्य केले. त्यामुळे येथील वास्तुकलेत अनेक संस्कृती आणि शैलींचा सुंदर संगम पाहायला मिळतो, जो इतिहासप्रेमींना खूप आकर्षित करतो.

Daulatabad Fort | Dainik Gomantak

Vinfast vf6 vf7: महिंद्रा अन् ह्युंदाईला टक्कर देण्यासाठी व्हिनफास्टच्या दोन दमदार इलेक्ट्रिक 'एसयूव्ही' सज्ज!

आणखी बघा