Akshata Chhatre
उन्हाळयाच्या दिवसांत भरपूर दही खावं असं वाटतंय ना? आणि जर का तुम्ही दररोज दही खात असाल तर त्याचे तुमच्या शरीरावर काय परिणाम होत असतील माहितीये का?
दह्यात असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांसाठी फायदेशीर असतात. अपचन, गॅस, जडपणा यावर नियंत्रण ठेवायला मदत मिळते.
दररोज दही खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत होते. सर्दी, खोकला यापासून संरक्षण मिळतं तसंच आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरिया वाढतात.
दह्यात भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D असल्याने हाडं, दात आणि सांधे मजबूत होतात
दह्यात असलेलं प्रोटीन स्नायूंची झीज भरून काढतं. वर्कआउटनंतर दही खाणं फायदेशीर आहे.
दही कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतं, रक्तदाब संतुलित ठेवतं आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.