Sameer Amunekar
साबण निवडण्यापूर्वी तुमची त्वचा कोरडी (Dry), तेलकट (Oily) की संवेदनशील (Sensitive) आहे हे जाणून घ्या. त्वचेच्या गरजेनुसार घेतलेला साबणच खरा फायदा देतो.
जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर ग्लिसरीन (Glycerin), मध, मलाई किंवा शिया बटर (Shea Butter) असलेले साबण निवडा. हे घटक त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात.
तेलकट आणि मुरुम (Acne) येणाऱ्या त्वचेसाठी कडुनिंब (Neem), टी-ट्री ऑईल किंवा सॅलिसिलिक ॲसिड असलेला साबण उत्तम ठरतो. यामुळे जादा तेल नियंत्रित होते आणि जंतू दूर राहतात.
संवेदनशील त्वचेसाठी कोरफड (Aloe Vera), चंदन किंवा कॅमोमाईलसारखे सौम्य आणि नैसर्गिक घटक असलेले साबण वापरावेत, ज्यामुळे त्वचेची जळजळ किंवा रॅशेस होत नाहीत.
अति तीव्र सुगंध (Strong Fragrance), पॅराबेन्स (Parabens) आणि सल्फेट्स (Sulfates) असलेले साबण वापरणे टाळा. हे घटक त्वचेचे नैसर्गिक तेल हिरावून घेतात आणि संसर्ग वाढवतात.
आपल्या त्वचेचा नैसर्गिक pH साधारण ५.५ असतो. त्यामुळे साबण खरेदी करताना तो 'pH Balanced' किंवा 'Skin-friendly' आहे का, हे आवर्जून तपासा.
त्वचेचे आजार दूर ठेवण्यासाठी अँटी-बॅक्टेरियल साबण चांगले असले, तरी रोजच्या वापरामुळे त्वचा जास्त कोरडी पडू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा गरजेनुसारच त्यांचा वापर करा.