Sameer Amunekar
भव्य राजवाडे, संथ वाहणारे तलाव आणि रोमँटिक सूर्यास्त यासाठी उदयपूर प्रसिद्ध आहे. येथील 'लेक पिचोला' आणि 'सिटी पॅलेस'चे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपणे म्हणजे कोणत्याही फोटोग्राफरसाठी पर्वणीच!
गंगा नदीचे घाट, सकाळची दिव्य आरती, साधू-संत आणि गजबजलेल्या गल्ल्या... वाराणसी शहर फोटोग्राफीसाठी अशा काही फ्रेम्स देते ज्या जगात कुठेही पाहायला मिळणार नाहीत. येथील 'स्ट्रीट फोटोग्राफी' थक्क करणारी आहे.
निळेभोर तलाव, उंच बर्फाच्छादित पर्वत आणि वळणावळणाचे रस्ते... लडाख हे लँडस्केप (Landscape) फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी एक स्वप्न आहे. येथील 'पॅंगॉन्ग तलाव' तुमच्या कॅमेऱ्याची शोभा आणखी वाढवेल.
गुलाबी रंगाची ऐतिहासिक वास्तू, 'हवा महल'ची अप्रतिम रचना आणि 'आमेर किल्ल्या'ची भव्यता... जयपूर हे आर्किटेक्चर (Architecture) फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम शहर मानले जाते. येथील रंगीबेरंगी बाजारपेठाही तितक्याच सुंदर आहेत.
इतिहासाची आवड असलेल्या फोटोग्राफर्ससाठी हम्पी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील प्राचीन मंदिरांचे अवशेष, अवाढव्य खडक आणि तुंगभद्रा नदीचा परिसर फोटोंना एक वेगळाच 'विंटेज लूक' (Vintage Look) देतात.
हावडा ब्रिज, जुन्या काळातील ट्रॅम, पिवळ्या टॅक्सी आणि ब्रिटिशकालीन वास्तू... कोलकात्याच्या हवेतच एक वेगळीच कला आहे. स्ट्रीट आणि पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी हे शहर अतिशय समृद्ध आहे.
जर तुम्हाला निसर्ग फोटोग्राफीची (Nature Photography) आवड असेल, तर मुन्नारचे चहाचे मळे, धुक्याची चादर आणि हिरवेगार डोंगर तुमच्या कॅमेऱ्याला नक्कीच भुरळ घालतील.