गोमन्तक डिजिटल टीम
दक्षिण गोव्यातील कुडतरी या गावात अनेक पाणवठे/तळी आहेत.
गळ घालून मासे पकडण्याची स्पर्धा रेजिनाल्ड ट्रस्टने गावात पहिल्यांदाच आयोजित केली होती.
तळ्याच्या काठी जवळपास २०० लोक स्त्री आणि पुरुष या स्पर्धेत सहभागी झाले.
शेकडोच्या संख्येने स्त्री-पुरुष आपल्या हातात गळ घेऊन वेतणे तळ्यावर आले.
तीन गटात स्पर्धकांची विभागणी केली होती- ३५ वर्षांवरील पुरुष, ३५ वर्षांवरील महिला आणि १८ ते ३४ या वयोगटातील युवा.
अनुक्रमे ७,०००, ६,००० आणि ५००० प्रत्येकी अशी पारितोषिके होती. 'पकडलेल्या माशांचे अधिकाधिक वजन' हा बक्षीस जिंकण्याचा स्पर्धेचा निकष होता.
गळाला लागलेला पहिला मासा, पकडलेला मोठा खेकडा, अधिकाधिक मासे अशी इतरही अनेक बक्षिसे होती.