Sameer Panditrao
राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा वरखाली होत आहे. ऐन हिवाळ्यात उष्म्यामुळे घामाच्या धारा ओघळू लागल्या आहेत.
पंखा किंवा वातानुकूलन सेवेशिवाय घरात थांबणे कठीण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनतेला अस्वस्थ वाटत आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांऐवजी आग्नेय वाऱ्यांचा प्रभाव अधिक आहे. यामुळे थंडीचा प्रभाव कमी होऊन उष्मा वाढला आहे.
गोवा वेधशाळेनुसार, पुढील आठवडाभर हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेने हिवाळ्यातील थंडीला बाजूला सारले आहे.
सत्तरी, धारबांदोडा, पेडणे, केपे, सांगे भागांत थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. रात्री आणि पहाटेही उष्णता जाणवत आहे.
कमाल व किमान तापमानात १०-११ अंशांचा फरक आहे. पंधरा अंशांपेक्षा अधिक फरक झाल्यास आंबा व काजू मोहर करपण्याची शक्यता आहे.
पुढील चार दिवस राज्यात हवामान कोरडे राहील. पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे, परंतु थंडी अजूनही कमीच राहील.