Manish Jadhav
12th फेल फेम विक्रांत मेस्सीच्या साबरमती रिपोर्ट चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. विक्रांतबरोबर या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री राशी खन्ना सुद्धा आहे.
अभिनेत्री राशी खन्नाने दिल्लीत आयोजित स्पेशल स्क्रीनिंग दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तिचा 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट पाहिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित 'साबरमती रिपोर्ट' पाहणं माझ्यासाठी विलक्षण अनुभव होता.
एएनआयशी बोलताना राशी म्हणाली की, एवढ्या मोठी राजकीय हस्तींशी मला संवाद साधण्याची तसेच, त्यांच्याबरोबर स्क्रिनिंगला हजेरी लावण्याची संधी मिळाली हा माझ्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
साबरमती रिपोर्ट चित्रपटात राशीने एका महिला पत्रकाराची भूमिका साकारली आहे. राशीच्या या भूमिकेला तिच्या चाहत्यांसोबतच प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळत आहे.
राशीच्या बेधडक शैलीचं सोशल मीडियावर भरभरुन कौतक होत आहे.