Akshata Chhatre
गोव्यात एक खास गाव असं आहे जे 11 महिने पाण्यात बुडलेलं असतं मात्र केवळ मे महिन्यात हे गाव दिसतं. हे गोव्यातील एक अद्वितीय आणि अप्रतिम ठिकाण पाहायचं असेल तर नक्कीच इथे भेट द्या.
कुर्डी गाव तिथल्या जलाशयामुळे 11 महिने पाण्याखाली बुडते. पाणी ओसरल्यानंतर, मे महिन्यात गाव पुन्हा वर येते.
कुर्डी गाव हे पोर्तुगीज काळातील किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावाचे सांस्कृतिक वारसा आणि जुन्या चर्चेच्या अवशेषांमुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे.
कुर्डी गावाच्या आसपासच्या पर्वत, जंगल, आणि हिरव्या रानांमुळे गावातील निसर्ग सुंदर आहे. येथील ट्रेकिंग आणि शांतदायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करतं.
कुर्डी गाव प्रत्येक वर्षी मे महिन्यात पाण्याच्या वर येतं. हा अद्वितीय अनुभवासाठी पर्यटकांनी येथे भेट द्यावी असं हे ठिकाण आहे.
खरंतर गोवा समुद्रकिनारे,पार्टी आणि इतर गोष्टीनासाठी प्रसिद्ध आहे. मे महिन्यात लोकं फेणीसाठी गोव्यात येतात. पण तुम्हाला काही हटके पाहायचं असेल तर या गावाला भेट द्या.
यंदाच्या वर्षी जर का मे महिन्यात गोव्याला जाण्याच्या विचारात असाल तर हे गाव नक्कीच भेट द्यावं असं ठिकाण आहे.