Akshata Chhatre
नमिता थापर एक प्रेरणादायी उद्योजिका आहेत. त्या एम्क्युर फार्मसुटिकल्स नावाची कंपनी चालवतात. त्या या कंपनीच्या कार्यकारी संचालिका आहेत. भारतातील महिला उद्योजिकांमध्ये नमिता हे नाव आवर्जून घेतलं जातं.
नमिता ह्यांचा जन्म पुणे शहरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण ते उच्च शिक्षण मुंबईतून झाले. आणि त्यांनी MBA चं शिक्षण अमेरिकेतून पूर्ण केलंय.
व्यवसायाच्या क्षेत्रात शिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर नमिता यांनी स्वतःला सिद्ध केलं. एम्क्युर फार्मसुटिकल्सच्या कार्यकारी संचालिका म्हणून त्यांनी कंपनीला नवीन उंचीवर पोहोचवलं आणि त्या इंडस्ट्रीमध्ये एक मोठं नाव कमवलं.
नमिता थापर इतर महिलांसाठी नेहमी प्रेरणा बनल्या आहेत. त्यांनी महिला नेतृत्व, समानता, आणि स्वावलंबनावर कायमच जोर दिला आहे. त्यांच्या मते महिलांना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सक्षम बनवणं आवश्यक आहे.
नमिता यांच्या मार्गदर्शनाखाली एम्क्युर फार्मसुटिकल्सने मोठे यश मिळवले आहेत. कंपनीचे जागतिक पातळीवर विस्तार, नवीन प्रॉडक्ट लाँचेस आणि सामाजिक दायित्व यामुळे त्या व्यावसायिक जगात त्या आदर्श बनल्या आहेत.
"महिलांनी त्यांच्या कुवतीवर विश्वास ठेवून स्वतःची आव्हानं स्वीकारली पाहिजेत." असं नमिता नेहमी म्हणतात.