Sameer Amunekar
आपण आजारी पडलो, की डॉक्टरांकडे जातो, औषध घेतो आणि आराम करतो. पण निसर्गात असे अनेक प्राणी आहेत, जे स्वतःच स्वतःवर उपचार करतात.
प्राणी औषधांशिवाय, क्लिनिकशिवाय उपचार करतात. अशाच विलक्षण उपचारपद्धतीचं एक उदाहरण म्हणजे कावळा आणि मुंग्यांची टेकडी.
हे ऐकायला आश्चर्यकारक वाटेल, पण जेव्हा कावळ्याला स्वतःची तब्येत ढासळल्यासारखी वाटते, तेव्हा तो कोणताही वैद्य किंवा औषध शोधत नाही. तो थेट एखाद्या मुंग्यांच्या टेकडीकडे जातो.
मुंग्या त्यांच्या शरीरातून ‘फॉर्मिक ॲसिड’ नावाचा एक रसायन सोडतात. हे ॲसिड नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणून काम करतं.
ॲसिड पंखांवर, त्वचेवर असलेले बॅक्टेरिया, बुरशी आणि परजीवी नष्ट करतं. त्यामुळे कावळा स्वतःच्या शरीरातील संसर्ग टाळण्यासाठी ही अनोखी युक्ती वापरतो.
शास्त्रज्ञांनी या उपचार पध्दतीला "एंटिंग" असे नाव दिलं आहे.