Sameer Amunekar
क्रिस्टियानो रोनाल्डो फॉर्मल सूटमध्ये नेहमीच आकर्षक दिसतो. त्याचा क्लासी लुक आणि आत्मविश्वास चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो.
साधा टी-शर्ट, जीन्स आणि स्नीकर्स अशा कॅज्युअल लुकमध्येही रोनाल्डोची स्टाईल चाहत्यांना भुरळ घालते.
ब्लॅक रंगाच्या कपड्यांमध्ये रोनाल्डोचा लुक अधिकच शानदार दिसतो. त्याची ही स्टाईल अनेक चाहत्यांना आवडते.
वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये रोनाल्डो पारंपरिक पोशाखातही दिसला आहे. त्याच्या या लुकचीही सोशल मीडियावर चर्चा होते.
स्टायलिश सनग्लासेस आणि खास हेअरस्टाइलमुळे रोनाल्डोचा अंदाज आणखी हटके दिसतो.
मैदानाबाहेरही रोनाल्डोचा स्पोर्टी लुक चाहत्यांना आवडतो. ट्रॅकसूट आणि स्पोर्ट्सवेअरमध्ये तो नेहमीच फिट आणि स्टायलिश दिसतो.
फॉर्मल असो किंवा कॅज्युअल, रोनाल्डो प्रत्येक लुक आत्मविश्वासाने कॅरी करतो. त्यामुळेच त्याची फॅशन स्टाईलही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.