'या' क्रिकेटपटूंनी गाजवलेय राजकारणाचे मैदान

Ashutosh Masgaunde

मोहम्मद अझरुद्दीन

स्टायलिश हैदराबादी फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन 2009 मध्ये काँग्रेसकडून, उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून निवडणूक जिंकून खासदार बनले होते.

Mohammad Azaruddin | Dainik Gomantak

गौतम गंभीर

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षच्या तिकिटावर दिल्लीतून खासदार झाला आहे.

Gautam Gambhir | Dainik Gomantak

नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू यांनी 2004 मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आमदार, खासदार आणि मंत्री म्हणून काम केले आहे.

Navjyot Singh Siddhu | Dainik Gomantak

कीर्ती आझाद

माजी अष्टपैलू खेळाडू कीर्ती आझाद, जे 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते, त्यांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले आणि बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून तीनदा खासदार झाले आहेत.

Kirti Azad | Dainik Gomantak

मनोज तिवारी

भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी सध्या तृणमुल कॉंग्रेसचा सदस्य असून, तो सध्या पश्चिम बंगालमध्ये तो क्रीडा मंत्री आहे.

Manoj Tiwary | Dainik Gomantak

विनोद कांबळी

विनोद कांबळीने 2009 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत विक्रोळीतून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये तो पराभूत झाला.

Vinod Kambli | Dainik Gomantak

अंबाती रायूडू

आयपीएल मध्ये दमदार कामगिरी करणारा अंबाती रायूडू नुकताच निवृत्त झाला असून, तो आता राजकारणात प्रवेश करणार आहे. मात्र, तो कोणत्या पक्षात जाणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ambati Rayudu | Twitter
अधिक पाहाण्यासाठी