Akshay Nirmale
त्याचे पूर्ण नाव मोहम्मद शमी अहमद असे आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे 3 सप्टेंबर 1990 रोजी त्याचा जन्म झाला. नॅशनल हायवे क्रमांक 24 वर 'साहसपुर अलीनगर' हे गाव आहे. हे मोहम्मद शमीचे गाव आहे.
शमीला बिर्याणी खूप आवडते. कोलकाता नाईट रायडर्सचे मेंटर देबब्रत दास हे शमीसोबत दोन विकेट घेतल्या की दोन प्लेट बिर्याणी अशी पैज लावायचे आणि त्यात शमी नेहमी यशस्वी व्हायचा.
शमीला गुजराती पदार्थ आवडतात. त्याचे डाएट हायप्रोटिनचे असते. सॅलड आणि कार्ब्जही तो घेतो. तो फास्टफूड खाणे टाळतो.
साल 2013 मध्ये पाकिस्तानविरोधात वने डे पदार्पणाच्या सामन्यात शमीने 9 ओव्हर टाकल्या, त्यातील 4 मेडन होत्या. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज आहे.
बॉल रिव्हर्स स्विंग करण्यात माहिर असलेल्या शमीने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये अफगानिस्तान विरोधात हॅटट्रिक घेतली होती.
वनडेमध्ये भारताकडून सर्वात जलद 100 विकेट घेतल्या आहे. शमीने 56 सामन्यात 100 विकेट घेतल्या आहेत. तर जसप्रीत बुमराह याने 57 मॅचमध्ये 100 विकेट घेतल्या आहेत.
2014 मध्ये शमीने मॉडेल आणि चीअरलीडर हसीन जहाँ हिच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे. 2018 मध्ये पत्नीने त्याच्यावर हुंडा आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला. नंतर दोघांनी घटस्फोट घेतला.
शमीची एकूण संपत्ती 50 कोटी रूपये असल्याचे सांगितले जाते. बीसीसीआयकडून मिळणारा पगार, आयपीएल, जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न यातून त्याची कमाई होते.