खरी ट्रॉफी देतात की रिप्लिका? जर्सीचा रंग कधी बदलला? जाणून घ्या वर्ल्डकपच्या इंटरेस्टिंग गोष्टी...

Akshay Nirmale

सुरवात

1975 पुरूषांच्या क्रिकेटचा वर्ल्डकप सुरू झालेला असला तरी त्यापुर्वी दोन वर्षे म्हणजेच 1973 मध्ये इंग्लंडने महिलांच्या क्रिकेट वर्ल्डकचे आयोजन केले होते.

Cricket World Cup 2023 | google image

इंग्लंडबाहेर प्रथम

1975, 1979 आणि 1983 असे पहिले तीन वर्ल्डकप इंग्लंडमध्ये आयोजित केले होते. 1987 साली पहिल्यांदाच वर्ल्डकप इंग्लंडबाहेर झाला. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान संयुक्त आयोजक होते.

Kapil Dev | google image

जर्सीचा रंग बदलला

1992 च्या वर्ल्डकपपासून जर्सीचा रंग पांढऱ्यावरून विविध रंगी, पांढऱ्या रंगाच्या बॉलचा समावेश आणि डे-नाईट मॅचेसची सुरवात झाली.

cricket white ball | Dainik Gomantak

भारत एकमेव

1983 चा वर्ल्डकप हा अखेरचा असा वर्ल्डकप होता ज्यात 60 ओव्हरच्या मॅचेस झाल्या होत्या. त्यामुळे 60 ओव्हर्स आणि 50 ओव्हर्स असे दोन्ही वर्ल्डकप जिंकणारा भारत हा एकमेव देश आहे.

MS Dhoni | google image

ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

ऑस्ट्रेलिया एकमेव असा संघ आहे ज्याने 5 वेळा वर्ल्डकप जिंकला. शिवाय ऑस्ट्रेलियाने 1999, 2003 आणि 2007 असा सलग तीन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. यापूर्वी वेस्टइंडिजने 1975 आणि 1979 असे सलग दोन वर्ल्डकप जिंकले होते.

Ricky Ponting | google image

वेस्ट इंडिजशिवाय...

एकेकाळी क्रिकेटचे पॉवर हाऊस मानला जात असलेला वेस्ट इंडिजचा संघ खेळत नसलेला 2023 चा वर्ल्डकप हा आत्तापर्यंतचा एकमेव आहे. विंडिज संघ क्वालिफायर मॅचमध्ये स्कॉटलंडविरूद्ध पराभूत झाला होता.

west indies | google image

बाऊंड्रीलाईन

2023 च्या वर्ल्डकपमध्ये क्रिजपासून (स्ट्रायकर एंड) बाऊंड्रीलाईन सर्वबाजूंना 70 मीटर करण्यात आली.

Cricket World Cup 2023 | google image

ट्रॉफी की रिप्लिका?

विजेता संघ ओरिजनल ट्रॉफी घरी घेऊन जात नाही. 1999 पासून एकच कायमस्वरूपी वर्ल्ड कप ट्रॉफी करण्यात आली. तेव्हापासून विजेत्या संघाला या कायमस्वरूपी वर्ल्डकपची रिप्लिका दिली जाते आणि स्पर्धा संपली की ओरिजनल ट्रॉफी पुन्हा मुख्यालयात ठेवली जाते.

Cricket World Cup 2023 | google image
Virat Kohli | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...