Sameer Panditrao
सर्वसमावेशक कॉर्पोरेट फिटनेस प्रोग्राम अमलात आणण्यासाठी काही विशेष प्रयत्न आणि आर्थिक गुंतवणूक करावी लागते.
त्यामुळे अशा कार्यक्रमातून मिळणारे फायदे हे सर्वांसाठी आणि जास्तीत जास्त प्रमाणात असावे अशी अपेक्षा असते.
जे कर्मचारी फिटनेस कार्यक्रमांमध्ये मनापासून सहभागी होतात ते अधिक सतर्क आणि कार्यक्षम असतात.
नियमित व्यायामाची सवय लागल्यामुळे व्यक्ती हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या तीव्र आजारांपासून दूर राहते.
स्वस्थ आणि निरोगी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर कंपनीला खर्च करावा लागत नाही.
फिटनेस कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल चांगले राहते, त्यांचा मूड चांगला राहतो आणि कामाचे समाधान मिळते.
कॉर्पोरेट जिम मेंबरशिप किंवा कॉर्पोरेट वैयक्तिक ट्रेनिंग अशा कार्यक्रमांमुळे कर्मचाऱ्याचे आरोग्य उत्तम आणि सकारात्मक राहते. अशा वातावरणामुळे व्यक्तीची प्रतिभा उत्तम काम करते.
लहान मुलांना हृदयविकारापासून दूर ठेवण्यासाठी काय करावे?