Manish Jadhav
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
आफ्रिकन संघाने गेल्या 2 वर्षात अनेक नवीन खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली, परंतु सर्वात संस्मरणीय पदार्पण कॉर्बिन बॉशचे ठरले.
या उजव्या हाताच्या अष्टपैलू खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पण केले आणि सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत दोन संस्मरणीय विक्रम केले.
कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेणाऱ्या बॉशने दुसऱ्या दिवशीही उत्कृष्ट अर्धशतक झळकावले आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला.
सेंच्युरियनमध्ये 26 डिसेंबरपासून सुरु झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कॉर्बिन बॉश चांगल्या फॉर्ममध्ये होता.
वेगवान गोलंदाज कॉर्बिनने कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानी कर्णधार शान मसूदची विकेट घेतली. अशाप्रकारे, बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पण करताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ठरला.
कॉर्बिन बॉशसाठी हे पदार्पण खूप खास होते कारण अनेक वर्षांपूर्वी त्याचे वडील टर्टियस बॉश यांनीही दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेट खेळले होते.
कॉर्बिनचे वडील टर्टियस बॉश यांचे 2000 मध्ये वयाच्या 33 व्या वर्षी अचानक निधन झाले. त्यावेळी कॉर्बिनचे वय अवघे 5 वर्षे होते. टर्टियस यांना विष देवून मारल्याच्या बातमीने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. मात्र अतापर्यंत त्याची पुष्टी होऊ शकली नाही.