तांबे की काच: पाणी पिण्यासाठी कोणती बाटली आहे आरोग्यासाठी बेस्ट?

Akshata Chhatre

काचेची शुद्धता

काच ही केमिकल्स फ्री असते. यात पाणी, ज्यूस किंवा चहा ठेवल्यास त्याची चव बदलत नाही आणि ती कोणत्याही द्रवाशी प्रक्रिया करत नाही.

copper water advantages | Dainik Gomantak

तांब्याचे फायदे

तांब्यातील पाणी पचन सुधारते, मेटाबॉलिज्म वाढवते आणि शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते.

copper water advantages | Dainik Gomantak

काचेची नाजूकता

काचेच्या बाटल्या वजनाने जड असतात आणि फुटण्याची भीती असते. प्रवासासाठी तांब्याची बाटली अधिक टिकाऊ ठरते.

copper water advantages | Dainik Gomantak

तांब्याची देखभाल

तांब्याची बाटली हवा आणि ओलाव्यामुळे काळी पडू शकते. ती लिंबू किंवा पित्तबंरीने नियमित स्वच्छ करणे आवश्यक आहे.

copper water advantages | Dainik Gomantak

सावधगिरी बाळगा

तांब्याच्या बाटलीत कधीही लिंबू पाणी किंवा आंबट पदार्थ ठेवू नका, यामुळे विषबाधा होण्याचा धोका असतो.

copper water advantages | Dainik Gomantak

काय सर्वोत्तम?

सकाळी रिकाम्या पोटी पिण्यासाठी तांब्याची बाटली उत्तम आहे, तर ऑफिस किंवा जिमसाठी काचेची बाटली स्वच्छ आणि सुरक्षित आहे.

copper water advantages | Dainik Gomantak

परफेक्ट कॉम्बो

रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी साठवा आणि सकाळी ते प्या. उरलेल्या दिवसासाठी काच किंवा स्टीलच्या बाटलीचा वापर करणे सर्वात प्रॅक्टिकल आहे.

copper water advantages | Dainik Gomantak

अक्षय खन्नाची ती हेअरस्टाईल आहे विग; वयाच्या 19व्या वर्षीच का आला 'टक्कल'पणा?

आणखीन बघा