Manish Jadhav
गोवा म्हटलं की, महोत्सवांचा माहोल... गोव्यातील महोत्सव पाहण्यसाठी जगभरातून पर्यटक येतात.
गोव्यात यंदाच्या सनबर्न महोत्सवाला कडाडून विरोध होत आहे. दरवर्षी उत्तर गोव्यात या महोत्सवाचे आयोजन केले जाते.
यंदाच्या सनबर्न महोत्सवाचे ठिकाण हे दक्षिण गोवा आहे. आयोजकांकडून ठिकाणाची घोषणा होताच वादाची ठिणगी पडली.
दक्षिण गोव्यातील गावांनी सनबर्नच्या आयोजनाला विरोध सुरु केला आहे. ग्रामपंचायतींनी ठराव मांडून आपला विरोध दर्शवला. कामुर्लीतील गावकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
ज्या कोमुनिदाद जागेत हा सनबर्न आयोजनाचा प्रस्ताव आहे, तिथे आमची शेती आहे. आता माझी सासू व मी तिथे शेती करतो. एकदा सनबर्नचा गावात शिरकाव झाल्यास तो माघारी परतणार नाही, त्यामुळे गरज पडल्यास कोर्टात जाऊ, अशी प्रतिक्रिया कामुर्लीतील एका गावकऱ्याने दिली.
मुळात आमचे कामुर्ली हे सांस्कृतिक व शांतता प्रिय गाव आहे. जे गावात सनबर्न आणून पाहत आहेत, त्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत सनबर्न कामुर्ली गावातून मागे जात नाही, तोपर्यंत आमचा विरोध सुरूच राहणार आहे.
मुळात सनबर्नची संकल्पना मला माहिती नाही. आम्ही कधी असले इव्हेंट पाहिले नाहीत किंवा आम्हाला रुची नाही. सनबर्न म्हणजे तिथे संगीत वाजते व गर्दीमुळे लोकांचे मोबाईल चोरले जातात, एवढेच ऐकले आहे.
कामुर्ली गावात सनबर्नसारखा महोत्सव आल्यास आमचा त्याला प्रखर विरोध असेल. मुळात गावात एक मेगा प्रकल्प येऊ पाहतोय. याला यापूर्वीच आम्ही हरकत घेतली आहे. या प्रकल्पातील काहीजण सनबर्नला प्रोत्साहन देत आहेत.