Sameer Amunekar
उचकी लागणे हा एक सामान्य परंतु थोडासा त्रासदायक अनुभव असतो. अचानक सुरु होणारी आणि थांबण्याचं नाव न घेणारी उचकी अनेकदा गोंधळात टाकते.
उचकी ही आपल्या डायाफ्राम मसल्सच्या अनैच्छिक आकुंचनामुळे लागते. डायाफ्राम म्हणजे छाती आणि पोटामधील स्नायूंची एक भिंत असते जी श्वास प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते.
थंड पाणी एकाच वेळी छोट्या घोटांनी पिलं की उचकी थांबते. पाणी डायाफ्रॅमला शांत करतं.
खोल श्वास घेऊन काही सेकंद श्वास रोखून ठेवा. यामुळे छातीतला दाब बदलतो आणि उचकी थांबते.
एक चमचा साखर हळूहळू तोंडात ठेवा आणि विरघळू द्या. त्यामुळे घशातील स्नायूंचा ताण कमी होतो.
अर्धा लिंबू घेऊन त्यावर थोडं मीठ टाका आणि चोखा.असं केल्यास उचकी थांबू शकते.