'कळंगुट' दुर्घटनेनंतर जलसफारी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह? 'या' निकषांवर लक्ष देण्याची गरज

गोमन्तक डिजिटल टीम

बोट दुर्घटना

२५ डिसेंबर रोजी घडलेल्या बोट दुर्घटनेनंतर कळंगुट समुद्रकिनाऱ्यांवर जलसफर व जलक्रीडाचे प्रकार बंद होते.

Water sports safety Goa

नियमावली

समुद्रातील अशा जलसफरीविषयी किती वयोमर्यादेतील मुलांना बोटमध्ये चढण्यास परवानगी देण्याबाबत कुठलेच निकष किंवा स्पष्ट नियमावली नाही.

Water sports safety Goa

ओव्हरलोड

ओव्हरलोड करून प्रवासी बोटीवर कोंबणे हे समुद्रकिनाऱ्यांवरील जलसफरीतील प्रकार नित्याचेच आहेत आणि एखादी दुर्घटना घडल्यानंतरच हे विषय प्रकर्षाने समोर येतात.

Water sports safety Goa

थेट अटक

आता जलसफर करणाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास, संबंधितांना थेट अटकच करावी. त्याचप्रमाणे बोटीचा वाहतूक परवाना निलंबित करावा, अशी सूचना बंदर कप्तान अधिकाऱ्यांना केली आहे.

Water sports safety Goa

बोटमालकाचा दावा

बोटमालकांच्या दाव्यानुसार बोटवर सर्वांकडे लाईफ जॅकेट होते. बोटीचे इंजिन वाळूत रुतून बंद पडले. समुद्राच्या लाटेची जोरदार धडक बसल्याने बोट पाण्यात कलंडली. या बाबीवरही विचार व्हावा.

Water sports safety Goa

पोलिस गस्त

समुद्रकिनाऱ्यावर किनारी पोलिस कर्मचारी असतात; परंतु क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटमध्ये भरून जलसफर घडवत असल्यास याला आक्षेप घेतला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.

Water sports safety Goa

लाईफ जॅकेट

पर्यटकांना लाईफ जॅकेट घालणे अनिवार्य केले जाते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी शासकीय किंवा पर्यटन विभाग तिथे उपलब्ध नसतात, ही वस्तुस्थिती आहे.

Water sports safety Goa
गोव्याच्या हिवाळा सजतो 'या' रंगाने!