Sameer Amunekar
झोपण्याआधी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरल्यामुळे ब्लू लाईट मेंदूला सतर्क ठेवते आणि झोप उशिरा लागते.
रात्री खूप उशिरा किंवा तेलकट, मसालेदार जेवण केल्याने अपचन होते आणि झोपमोड होते.
रोज वेगवेगळ्या वेळी झोपल्यास शरीराचा नैसर्गिक झोपेचा रिदम बिघडतो.
चुकीच्या पोझिशनमध्ये झोपल्याने पाठदुखी, मानदुखी किंवा थकवा जाणवतो.
झोपण्याच्या काही तासांपूर्वी चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स घेतल्यास झोप लागत नाही.
झोपण्याआधी मनात ताण, चिंता किंवा कामाचे विचार ठेवल्यास झोप उथळ होते.
झोपेचे वातावरण शांत, अंधुक व आरामदायी नसेल तर झोप पूर्ण होत नाही.