Sameer Amunekar
नात्यात प्रभावी संवाद नसेल तर गैरसमज, शंका, आणि असंतोष वाढू लागतो. वेळेवर भावना शेअर न केल्यामुळे नातं हळूहळू तुटू लागतं.
फसवणूक, खोटं बोलणं, किंवा खोट्या अपेक्षा यामुळे एकदा विश्वास डळमळीत झाला की नातं टिकवणं कठीण होतं.
एकमेकांसोबत वेळ न घालवणं, सतत व्यस्त असणं, किंवा दुसऱ्या गोष्टींना जास्त प्राधान्य देणं नात्यांमध्ये अंतर निर्माण करतं.
नित्य वादविवाद, छोट्या गोष्टींवरून भांडणं होणं, आणि कोणताही समेट न होणं – यामुळे नात्याचं मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
जीवनाविषयी विचार, करिअर, विवाह, मुलं याबाबतीत भिन्न दृष्टीकोन असतील तर ते नात्यात दीर्घकालीन संघर्ष निर्माण करतात.
एका व्यक्तीनं दुसऱ्यावर केलेला धोका हे कोणत्याही नात्याचं सर्वात मोठं संकट असतं. यातून बाहेर पडणं अनेकदा अशक्य ठरतं.
जर जोडीदार सतत दुर्लक्ष करत असेल, टोमणे मारत असेल, किंवा मानसिक दबाव देत असेल, तर अशा नात्यात असुरक्षितता आणि वेदना वाढतात.