Sameer Amunekar
थेट जड वजन उचलायला सुरुवात करता? ही सवय धोकादायक आहे. वॉर्म-अप नसेल तर मसल्स नीट अॅक्टिव्ह होत नाहीत आणि इजा होण्याचा धोका वाढतो.
जड वजन उचलणं म्हणजेच बॉडी बिल्डिंग नाही. मसल्स वाढण्याऐवजी दुखापत होऊ शकते.
"जिम करतोय म्हणजे बॉडी बनेल" असं होत नाही. योग्य प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट्स नसेल तर मसल्स ग्रोथ थांबते.
दररोज तासनतास जिम? शरीराला विश्रांतीच नसेल तर मसल्स रिकव्हर कसे होणार? आठवड्यात किमान 1–2 रेस्ट डे हवेतच.
6 तासांपेक्षा कमी झोप? मग बॉडी वाढणार नाही. झोपेतच मसल्स रिपेअर आणि ग्रो होतात.
फक्त वेट ट्रेनिंग करून बॉडी शेपमध्ये येत नाही. थोडं कार्डिओ नसेल तर फॅट कमी होत नाही.
8–10 दिवसांत फरक दिसला नाही म्हणून जिम सोडता? बॉडी बनवणं हा प्रोसेस आहे, जादू नाही.