Workout Errors: डाएट आणि जिम करुनही रिझल्ट शून्य? 'या' चुकांमुळे मेहनत होतेय वाया, आजच बदला सवयी!

Manish Jadhav

पुरेशी झोप आणि विश्रांतीचा अभाव

जिममध्ये केवळ व्यायाम करणे पुरेसे नसते; मजबूत स्नायूंसाठी रात्री 7 ते 8 तासांची गाढ झोप आणि आठवड्यातून किमान एक रेस्ट डे अत्यंत गरजेचा असतो.

Gym Tips | Dainik Gomantak

आहारामध्ये प्रथिनांची कमतरता

वर्कआउट कितीही चांगला असला तरी आहारात योग्य प्रमाणात प्रोटीन, कार्ब्स आणि हेल्दी फॅट्स नसतील तर मसल्स गेन किंवा फॅट लॉस होत नाही.

Gym Tips | Dainik Gomantak

हायड्रेशनकडे दुर्लक्ष करणे

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास ताकद कमी होते, स्टॅमिना टिकत नाही आणि स्नायूंच्या रिकव्हरीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे जिम करताना पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

Gym Tips | Dainik Gomantak

चुकीचे फॉर्म आणि वर्कआउट तंत्र

वजन उचलताना किंवा व्यायाम करताना शरीराची चुकीची पोश्चर ठेवल्यामुळे स्नायूंवर योग्य ताण पडत नाही, ज्यामुळे अपेक्षेनुसार रिझल्ट मिळत नाही.

Gym Tips | Dainik Gomantak

वर्कआउट रुटीनला चिकटून राहणे

शरीर एकाच प्रकारच्या व्यायामाशी जुळवून घेते, ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड न करणे असे म्हणतो. त्यामुळे नियमित अंतराने व्यायामात बदल करणे गरजेचे आहे.

Gym Tips | Dainik Gomantak

सतत अतिउत्साह आणि ओव्हरट्रेनिंग

भरपूर वेळ जिममध्ये घालवणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त सराव करणे फायद्याऐवजी नुकसान करु शकते. ओव्हरट्रेनिंगमुळे शरीरावर ताण येतो आणि स्नायू बळकट होण्याऐवजी थकतात.

Gym Tips | Dainik Gomantak

अजिबात संयम नसणे

फिटनेस हा एक दीर्घकाळ चालणारा प्रवास आहे. नैसर्गिकरीत्या बदल घडण्यासाठी शरीराला योग्य वेळ आणि सातत्य लागते.

Gym Tips | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा