Gym Rules For Beginners: जीमच्या पहिल्याच दिवशी 'या' 7 चुका पडतील महाग! लक्षात ठेवा 'हा' सिक्रेट फॉर्म्युला

Manish Jadhav

वॉर्म-अप स्किप करणे

जीममध्ये गेल्यावर लगेच वजन उचलण्याची घाई करु नका. व्यायामापूर्वी 10 ते 15 मिनिटे हलका वॉर्म-अप आणि स्ट्रॅचिंग न केल्यास स्नायूंवर ताण येऊन गंभीर दुखापत होऊ शकते.

Gym Tips | Dainik Gomantak

ईगो लिफ्टिंग

इतरांचे पाहून किंवा दाखवण्यासाठी पहिल्याच दिवशी क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे ही सर्वात मोठी चूक आहे. सुरुवातीला वजनापेक्षा व्यायामाचा फॉर्म आणि पोश्चर योग्य ठेवण्यावर भर द्या.

Gym Tips | Dainik Gomantak

ट्रेनरच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करणे

स्वतःच्या मनाने किंवा सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून व्यायाम करु नका. जीममधील सर्टिफाइड ट्रेनरच्या सल्ल्यानुसारच तुमचा वर्कआउट प्लॅन सुरु करा.

Gym Tips | Dainik Gomantak

अयोग्य कपडे आणि शूज वापरणे

घट्ट जीन्स, कॅज्युअल टी-शर्ट किंवा साधे चप्पल घालून व्यायाम करणे धोकादायक ठरु शकते. नेहमी आरामदायी फ्लेक्सिबल स्पोर्ट्सवेअर आणि चांगल्या ग्रिपचे ग्रिपी शूजच वापरा.

Gym Tips | Dainik Gomantak

डिहायड्रेशन

व्यायाम करताना शरीरातून प्रचंड प्रमाणात घाम निघून जातो. अशा वेळी मध्यंतरी थोडे-थोडे पाणी न प्यायल्यास चक्कर येणे, थकवा किंवा स्नायूंमध्ये पेटके येण्याचा धोका असतो.

Gym Tips | Dainik Gomantak

पहिल्याच दिवशी अति-व्यायाम

एकाच दिवसात बॉडी बनत नाही. पहिल्याच दिवशी 2-3 तास जीममध्ये घालवण्याऐवजी 45 ते 60 मिनिटांचा संतुलित आणि हलका वर्कआउट करणे पुरेसे असते.

Gym Tips | Dainik Gomantak

डाएट आणि विश्रांती

केवळ व्यायाम करुन चालत नाही. व्यायामानंतर ३० मिनिटांच्या आत योग्य प्रोटिनयुक्त आहार घेणे आणि शरीराच्या रिकव्हरीसाठी 7 ते 8 तासांची गाढ झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Gym Tips | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा