Sameer Panditrao
कोलवा किनाऱ्यावर पर्यटकांची, नागरिकांची सतत रेलचेल असते.
या किनाऱ्यावर खाडीचे दूषित पाणी साचत आहे. देश विदेशातील पर्यटक या जागतिक दर्जाच्या समुद्र किनारी भेट देत असतात.
त्यांना साचत असलेल्या घाणीच्या पाण्यामुळे किनाऱ्यावर फिरणेही मुश्किल झाले आहे.
समुद्र किनाऱ्यावर साचत असलेल्या घाणीच्या पाण्यामुळे मोठ्या डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आणि येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
खाडीतून वाहून येत असलेले हे पाणी पर्यटन विभाग किंवा जलसंपदा विभाग समुद्रकिनाऱ्यावर साचलेले पाणी कसे काढणार? हा प्रश्न विचारला जात आहे.
बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांच्यासह जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी दूषित खाडी आणि किनाऱ्यावर साचलेल्या पाण्याची पाहणी केली
तातडीने उपाययोजना करण्याविषयी यावेळी चर्चा झाली.