Sameer Panditrao
गोमंतकीयासाठी, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
असून काजू झाडांवर कोवळी फळे दिसू लागली आहेत.
सध्या चांगली थंडी पडत असल्याने काजू, आंबा, फणस आदी पिकांसाठी हे वातावरण अत्यंत पोषक ठरले आहे.
काजू बियांना दरही समाधानकारक मिळतो. काजूला जीआय टॅग मिळाल्याने काजू बियांना बाजारात चांगली मागणी आहे.
सध्या झाडे मोहरली असून येत्या २० ते २५ दिवसांत काजूचे उत्पादन सुरू होईल.
काजूपासून बोंडाचा रस, फेणी, हुर्राक आदी उत्पादने तयार केली जातात.
आंब्याची झाडेही यंदा चांगली मोहरली आहेत. गेल्या वर्षी सुमारे ५० टक्के आंब्याचे उत्पादन मिळाले होते; यंदा ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.