Manish Jadhav
नारळपाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, पण काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी ते हानिकारक ठरु शकते.
ज्यांना किडनीचे जुनाट आजार आहेत, त्यांनी नारळपाणी पिणे टाळावे. नारळपाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.
डायरिया किंवा जुलाब होत असल्यास नारळपाणी पिऊ नये. नारळपाण्यात रेचक (Laxative) गुणधर्म असतात, जे डायरियाची समस्या आणखी वाढवू शकतात.
नारळपाण्यामध्ये रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म असतात. ज्यांचा रक्तदाब आधीच कमी आहे, त्यांना नारळपाणी प्यायल्याने चक्कर येणे, थकवा जाणवणे किंवा रक्तदाब आणखी कमी होणे असे त्रास होऊ शकतात.
सिस्टिक फायब्रोसिसच्या रुग्णांमध्ये सोडियमची पातळी आधीच कमी असू शकते आणि नारळपाणी प्यायल्याने ती आणखी कमी होऊ शकते.
नारळाची ऍलर्जी असणाऱ्या लोकांनी नारळपाणी पूर्णपणे टाळावे. नारळ हे काही लोकांसाठी ऍलर्जीचे कारण ठरु शकते.
ज्यांच्या शरीरात आधीच पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे, त्यांनी नारळपाणी पिणे धोकादायक ठरु शकते. यामुळे हृदयाच्या ठोक्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
नारळपाण्यात नैसर्गिक साखर आणि कॅलरीज असतात. जास्त प्रमाणात प्यायल्यास ते वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणू शकते.