Akshata Chhatre
नारळ पाण्याचा GI ५४ असल्याने ते मधुमेहींसाठी सुरक्षित मानले जाते. हे ब्लड शुगरमध्ये अचानक वाढ करत नाही.
यात मॅग्नेशियम असते, जे इन्सुलिनचे कार्य सुधारण्यास मदत करते. तसेच व्हिटॅमिन-सी आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.
हाय शुगरमुळे नसांचे नुकसान होऊ शकते. नारळ पाणी रक्तवाहिन्यांना लवचिक बनवते, ज्यामुळे शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारतो.
दिवसातून १५० ते २०० मिली (एक छोटा ग्लास) पाणी पुरेसे आहे. हे सकाळी किंवा व्यायामानंतर पिणे सर्वात उत्तम ठरते.
शहाळ्याच्या आतील मलाईमध्ये फॅट आणि कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी मलाई खाणे टाळलेलेच बरे.
नेहमी ताज्या नारळाचे पाणी प्या. बाटलीबंद पाण्यात साखर आणि प्रिजर्व्हेटिव्ह्ज असू शकतात, जे रक्तातील साखर वाढवू शकतात.