Sameer Amunekar
या खास ड्रिंकसाठी तुम्हाला लागेल १ कप ताजे नारळपाणी, १ चमचा इन्स्टंट कॉफी पावडर, आवडीनुसार मध किंवा साखर आणि भरपूर बर्फाचे खडे.
सर्वप्रथम एका छोट्या वाटीत १ चमचा कॉफी घ्या. त्यात अगदी थोडे कोमट पाणी किंवा नारळपाणी घालून कॉफी नीट विरघळवून (Coffee Decoction) घ्या.
कॉफीसाठी नेहमी ताजे आणि गोड नारळपाणी वापरा. शहाळे ताजे असल्यास पेयाची चव अधिक छान लागते.
एका उंच काचेच्या ग्लासमध्ये ५-६ बर्फाचे खडे टाका. उन्हाळ्यात हे पेय थंडगार पिणे जास्त फायदेशीर ठरते.
ग्लासमध्ये आधी तयार केलेले कॉफीचे मिश्रण ओता आणि त्यावर हळूहळू ताजे नारळपाणी टाका.
जर तुम्हाला अधिक गोड हवे असेल, तर त्यात थोडे मध किंवा गुळाची पावडर मिक्स करा. नारळपाणी नैसर्गिकरित्या गोड असल्याने साखर टाळणे आरोग्यासाठी उत्तम.
तुमची 'नारळपाणी कॉफी' तयार आहे! हे पेय प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स टिकून राहतात आणि थकवा त्वरित दूर होतो.