Manish Jadhav
पावसाळा सुरु झाला की आपल्याला आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घ्यावी लागते.
खासकरुन तेलकट त्वचा, कोरडी त्वचा आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना त्वचेची या दिवसांमध्ये जास्त काळजी घ्यावी लागते. आज (1 जुलै) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून नारळाच्या तेलाच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत.
नारळाचे तेल कोरड्या त्वचेवर ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.
तसेच, त्वचेला चमकदार बनवते. नारळाच्या तेलात असलेले फॅटी ॲसिड त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करतात.
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर हे तेल भेगा पडलेल्या त्वचेला बरे करण्यास मदत करते.
कोरडी त्वचा असलेल्या लोक आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर नारळाच्या तेलाने मालिश करु शकतात.