Sameer Amunekar
नारळाच्या मलईपासून बनवलेला हेअर मास्क डॅमेज झालेल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरतो. नारळामध्ये नैसर्गिक फॅटी आम्ल, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे केसांना खोलवर पोषण देतात आणि दुरुस्त करतात.
ड्रायनेस, स्प्लिट एंड्स आणि केस तुटण्याच्या समस्या कमी होतात.
केस मऊ आणि चमकदार होतात. तुमच्या केसांना नैसर्गिक चमक येण्यास मदत होईल.
केसांचा कोरडेपणा दूर होतो. डॅन्ड्रफ, खाज आणि कोरडेपणावर आराम मिळतो.
केसांना मुळांपासून बळकटी मिळते आणि वाढ जलद होते.
ताजी नारळाची मलई काढा. ती मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून गुळगुळीत पेस्ट करा. ही पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा. 30-40 मिनिटे तसेच ठेवा, नंतर सौम्य शॅम्पूने धुवा.