Pramod Yadav
म्हापसा येथील प्रसिद्ध देव बोडगेश्वराचा जत्रोत्सव सुरु असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देवाचे दर्शन घेतले.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी देखील सप्तनीक देव बोडगेश्वराचे दर्शन घेतले.
भक्तांच्या हाकेला धावणारा देव प्रसिद्ध असणाऱ्या बोडगेश्वराच्या चरणी खासदार श्रीपाद नाईक लीन झाले.
बोडगेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर चारही बाजूने उघडे आहे. मंदिराच्या मध्यभागी बोडगेश्वराची हातात काठी, डोक्यावर फेटा असलेली आकर्षक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते.
मंदिरात अनेक देवदेवतांच्या आकर्षक सुबक कोरीव मूर्ती ही या ठिकाणी आहेत. या मंदिराला पुरोहित नाहीत, सेवेकरीच या मंदिराची पूजा करतात.
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे पौष महिन्यात या मंदिराची जत्रा येते. पौष चतुर्दशीला जत्रेची सुरुवात होते आणि पौष पौर्णिमेला ती संपते.
पाच दिवसांच्या या जत्रेला गोव्यातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. बोडगेश्वर अंगवणीचा देव असेही मानले जाते.