Sameer Amunekar
ढगफुटी म्हणजे अतिशय कमी वेळेत एका मर्यादित भागावर प्रचंड प्रमाणात पाऊस पडणे. यामध्ये साधारण १० सें.मी. पेक्षा जास्त पाऊस एका तासाच्या आत पडतो.
हवेत मोठ्या प्रमाणात ओलावा आणि उष्णतेमुळे क्युम्युलोनिंबस प्रकारचे ढग तयार होतात. हे ढग अतिशय जाड आणि उंच असतात.
जमिनीवरची उष्णता आणि दमट वातावरणामुळे वाफेचे प्रवाह वेगाने वर जातात. हे प्रवाह ढगात जाऊन त्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याचे थेंब साठवतात.
जेव्हा ढगातील थंड हवा आणि गरम हवेत अचानक टक्कर होते तेव्हा ढगातील पाणी संतुलन गमावून मोठ्या प्रमाणात खाली कोसळते.
पर्वतरांगांमुळे हवेचा प्रवाह रोखला जातो आणि पाण्याने भरलेले ढग एका ठिकाणी अडकतात. त्यामुळे त्या भागात ढगफुटीचा धोका वाढतो.
मान्सून काळात ओलसर वारे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास ढगफुटीची शक्यता जास्त असते. हवामान बदलामुळे ही घटना आणखी वाढते आहे.
अचानक आलेल्या या पावसामुळे नद्यांना पूर येतो, डोंगर ढासळतात आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. त्यामुळे ही घटना अत्यंत धोकादायक मानली जाते