Sameer Amunekar
एका चमच्यात दालचिनी पावडर, एक चमचा मध मिसळा. हा पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो.
दालचिनीमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील रक्तप्रवाह वाढवतात, ज्यामुळे चेहरा टवटवीत आणि तजेलदार दिसतो.
दालचिनीचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि त्वचेवरील जंतूंना दूर करतात.
नियमित वापरामुळे त्वचेवरील डाग, पिगमेंटेशन आणि असमान टोन कमी होतो.
एका चमच्यात एलोवेरा जेल आणि चिमूटभर दालचिनी घालून मिश्रण तयार करा. हे स्किनवर लावल्याने मॉइश्चर आणि चमक दोन्ही टिकतात.
दालचिनीतील घटक कोलेजन उत्पादन वाढवतात, ज्यामुळे त्वचा तरुण आणि गुळगुळीत राहते.
दालचिनी थोडी तीव्र असते, त्यामुळे चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हातावर टेस्ट करा, त्वचेवर जळजळ झाली तर लगेच धुवा.